अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे शिवतीर्थावर
मुंबई, 24 मे (हिं.स.)। मनसे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील राजकीय आणि कौटुंबिक जवळीक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच
Aditya Thackeray Visits Shivtirth Amit Thackeray Birthday


Aditya Thackeray Visits Shivtirth Amit Thackeray Birthday


मुंबई, 24 मे (हिं.स.)। मनसे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील राजकीय आणि कौटुंबिक जवळीक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही ज्युनिअर ठाकरे एकाच फ्रेममध्ये दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

आदित्य ठाकरे शिवतीर्थावर पोहोचताच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदित्य ठाकरे यांनी पाया पडून आशीर्वाद घेतले. अमित ठाकरे यांना कडाडून मिठी मारली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी भलामोठा पुष्पगुच्छही अमित ठाकरे यांना भेट म्हणून दिला. दोघांची भेट होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यापासून मराठीच्या मुद्यावर मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वाढती जवळीकही चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी अमित ठाकरे यांच्या कुटुंबीयांची उपस्थितीही विशेष लक्षवेधी ठरली.

दरम्यान, अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणण्यात आलेल्या खास केकची मोठी चर्चा रंगली. या केकवर “नीट हटवा, देश वाचवा” असा संदेश लिहिण्यात आला होता. देशभरात नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळलेली असताना या संदेशाने सर्वांचे लक्ष वेधले. यापूर्वी राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर पोस्ट लिहून नीट परीक्षेतील गोंधळावर सरकारवर जोरदार टीका केली होती. अमित ठाकरे यांनीही या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली होती. वाढदिवसाच्या कार्यक्रमात अमित ठाकरे यांनी हा विशेष संदेश असलेला केक कापला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande