अंबाजोगाईत घरफोडी; साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास
बीड, 24 मे (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील बाणाईनगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बाणाईनगर परिसरातील एका शाळेजवळ घडली. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दा
अंबाजोगाईत घरफोडी; साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास


बीड, 24 मे (हिं.स.)।

अंबाजोगाई शहरातील बाणाईनगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बाणाईनगर परिसरातील एका शाळेजवळ घडली. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली असून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी घराबाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे चॅनल गेट कशाने तरी कापून काढले. त्यानंतर मुख्य लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवला. चोरट्यांनी थेट बेडरूम गाठून तेथील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडले. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच उपचारासाठी बाजूला काढून ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून चोरटे फरार झाले.

हा सर्व प्रकार उघडकीस आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच कुटुंबाने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेमुळे बाणाईनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. किरण राऊत यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande