अवकाळी पावसाने आंबेगाव तालुक्यात मोठे नुकसान; विवेक वळसे पाटीलांची पाहणी
पुणे, 24 मे (हिं.स.)। अवकाळी मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात मोठे नुकसान झाले असून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी गव्हाळीमळा, पाटीलवस्ती, दौंडवस्ती आणि गावठाण
Rain


पुणे, 24 मे (हिं.स.)।

अवकाळी मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात मोठे नुकसान झाले असून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी गव्हाळीमळा, पाटीलवस्ती, दौंडवस्ती आणि गावठाण परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला.दरम्यान, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून पंचनामे तातडीने पूर्ण करावेत तसेच शासकीय मदत लवकरात लवकर देण्यात यावी, असे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे.पूर्व आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव, पोंदेवाडी, काठापूर बुद्रुक आणि जारकरवाडी परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे राहत्या घरांची पडझड झाली असून पोल्ट्री शेड, जनावरांचे निवारा शेड, केळी बागा, कांदा चाळी, साठवलेला जनावरांचा चारा आणि विविध शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांना धीर दिला. यावेळी आंबेगाव तालुका शेतमाल संघाचे अध्यक्ष सतीश रोडे पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक मनोज रोडे पाटील, विशाल मिंडे, माऊली पाटील, पिंटू पाटील, कुमार मुंगसे, दादा गाढवे आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande