
परभणी, 24 मे (हिं.स.)।परभणी जिल्ह्यात शेतीकामे, वाहतूक तसेच विविध व्यावसायिक कारणांमुळे डिझेलच्या मागणीत मोठी वाढ झाली असून सध्या मागणी जवळपास दीडपट वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. घाबरून अतिरिक्त डिझेल साठा करू नये आणि आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे अनधिकृतरीत्या अतिरिक्त साठा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इंधनाचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवरील साठा, पुरवठा व वितरण व्यवस्थेचा नियमित आढावा घेतला जात असून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी शांतता व संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
***
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis