
लातूर, 24 मे (हिं.स)
रोटरी क्लब लातूर व कीर्ती रेसिडेन्सी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद भागवत कथा सांगतेनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचा संदेश या उपक्रमातून दिला गेला
हे रक्तदान शिबिर हत्ते नगर येथील कीर्ती रेसिडेन्सी परिसरात आयोजित करण्यात आले . शहरातील नागरिक, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते.
विशेष म्हणजे रक्तदात्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट तसेच पाच लाख रुपयांचा अपघात विमा मोफत देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे या उपक्रमाबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता होती
या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख म्हणून रो. किरीट जैन कार्यरत असून अध्यक्ष रो. बाळासाहेब खरे आणि सचिव रो. डॉ. नेताजी शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis