
मुंबई, 24 मे (हिं.स.) : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेची वाहतूकसेवा कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच्या सुमारास ठप्प झाली होती. आसनगाव ते खडवली दरम्यान अप-लाइन मार्गावरील पॉवर सप्लाय बंद पडल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. परिणामी, तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 4:30 ची पहिली लोकल 4:45 ते 5:25 दरम्यान अडकली असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेने दिली आहे. अशातच पहाटे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे यामुळे प्रचंड हाल झाले असून स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळाले. बराच वेळानंतर दुरुस्ती पथक पोहोचले. त्यानंतर काही तासांतच सेवा पूर्ववत सुरू झाली. मात्र प्रवाशांना निष्कारण मनस्ताप सहन करावा लागला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी