
बीड, 24 मे (हिं.स.)।
केज तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथे वडिलांना दारू पाजल्याच्या कारणावरून एका मटण विक्रेत्याने जनावरांच्या व्यापाऱ्यावर सत्तूरने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घडलेल्या या घटनेत भांडण सोडवण्यासाठी आलेल्या जखमीच्या आईलाही आरोपीने निर्घृणपणे मारहाण केली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात मटण विक्रेत्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पैठण येथील २८ वर्षीय जनावरांचे व्यापारी त्यांचे सहकारी आणि गावातील रिक्षाचालक रेणापूर येथील बाजारात जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी गेले होते. बाजार आटोपून गावी परतल्यानंतर ते दुकानावर थांबले. यावेळी माझ्या वडिलांना दारू कोणी पाजली, असा जाब विचारत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की दुकानातील सत्तूर काढून थेट सूरज यांच्या डोक्यात मारला, ज्यामुळे गंभीर जखमी झाले. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या यांच्या आईलाही आरोपी शकीलने केसाला धरून जमिनीवर पाडले आणि बेदम चापटाबुक्यांनी मारहाण केली. या अमानुष हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या रक्तरंजित घटनेनंतर पीडित यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस फौजदार भीमराव मांजरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis