चार महिलांचा जीव घेणारी टी २ वाघीण अखेर जेरबंद
चंद्रपूर, 24 मे (हिं.स.)। चार महिलांचा जीव घेणारी टी २ वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला करून ४ जण ठार झाल
चार महिलांचा जीव घेणारी टी २ वाघीण अखेर जेरबंद


चंद्रपूर, 24 मे (हिं.स.)। चार महिलांचा जीव घेणारी टी २ वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला करून ४ जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. वनविभागाने केलेल्या तपासात हा हल्ला टी-२ नामक वाघिणीने केल्याचे निष्पन्न झाले होते.

वन विभागाच्या विशेष पथकाने जंगल परिसरात तिचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. या पथकाने शनिवारी रात्री सव्वा सात च्या सुमारास 'ट्रॅन्क्युलायझर डार्ट'द्वारे पण त्यानंतर सदर वाघ ही नरभक्षक टी-२ वाघीण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ८ च्या सुमारास तिला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई झाली त्यावेळी टी-२ वाघिणीचे बछडे तिच्यासोबत नव्हते. त्यामुळे त्या बछड्यांचा वनविभाग स्वतंत्रपणे शोध घेणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande