लातूर पॅटर्नचे हित जोपासण्यासाठी बांधिल - भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर
लातूर, 24 मे (हिं.स.)। : लातूरचे संस्था व ट्युशन चालक यांच्या योगदानातून व विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून निर्माण झालेला लातूर पॅटर्न बदनाम करण्याचे षडयंत्र होवू लागले आहे. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी, अशी भूमिका भारतीय जनता
अजित कव्हेकर


लातूर, 24 मे (हिं.स.)।

: लातूरचे संस्था व ट्युशन चालक यांच्या योगदानातून व विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून निर्माण झालेला लातूर पॅटर्न बदनाम करण्याचे षडयंत्र होवू लागले आहे. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे. मात्र आपल्या स्वार्थी वृत्ताने लातूर पॅटर्न बदनाम करणाºया प्रवृत्तींना ठोस उत्तर देवून लातूर पॅटर्नचे हित जोपासण्यासाठी आपण बांधिल असल्याची ग्वाही भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणावरून उद्योग भवन परिसरातील खाजगी शिवकणी चालक, हॉस्टेल चालकांसह छोट्या - मोठ्या व्यवसायिकांच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. जिल्हा उद्योग केंद्राने बजावलेल्या नोटीसीमुळे संभ्रमीत झालेल्यांनी एकत्रित येवून लातूर पॅटर्न बचाव कृति समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या बैठकीत अजित पाटील कव्हेकर बोलत होते. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून लातूर पॅटर्न अबाधित ठेवणे ही सर्व लातूरकरांची सामुहिक जबाबदारी असल्याचे सांगून काही स्वार्थी प्रवृत्तीमुळे लातूर पॅटर्नला गालबोट लागण्याचे काम झाले आहे. मात्र या स्वार्थी प्रवृत्तीने लातूर पॅटर्न बदनाम होणार नाही यासाठी सर्वांनी एकत्रित येवून विचारमंथन करत मार्गक्रमण करणे अपेक्षित आहे. लातूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा अधिक नावलौकिक व्हावा यासाठी याआधीही आपण सातत्याने प्रयत्न केला असून यासाठी आवश्यक असणाºया शासन व प्रशासन स्थावर पाठपुरावाही केला असल्याचे स्पष्ट केले. नीट पेपर फुटी प्रकरणात केवळ लातूरच नव्हे तर पुणेही केंद्र बिंदू असल्याचे तपासात समोर आले असले तरी केवळ लातूरलाच बदनाम करण्याचे षडयंत्र काही मंडळीकडून होत आहे. हेच षडयंत्र आपल्याला हाणून पाडत असताना विद्यार्थी केंद्र बिंदू असणे आवश्यक असल्याचे कव्हेकर यांनी सांगितले.

लातूर पॅटर्नमुळेच लातूरच्या अर्थव्यवस्थेला गती मिळालेली असून यावर अनेकांचे उदरनिर्वाह चालत असल्याचे सांगून जिल्हा उद्योग केंद्राने जी नोटीस दिली आहे. त्यास आमचे समर्थन नाही, असे सांगून अजित पाटील कव्हेकर म्हणाले की, ज्या चुका झाल्या आहेत त्या चूका सुधारून संस्था व ट्युशन चालकांमध्ये सातत्याने संवाद होणे आवश्यक असल्याचे सांगितले. या माध्यमातून निर्माण झालेली स्पर्धाही विद्यार्थ्यांच्या हिताला बाधक ठरत असून विद्यार्थ्यांचे हित जोपाण्यासाठी संस्था व ट्युूशन चालकांनी एकमेकांशी पुरक भूमिका ठेवून विद्यार्थीहित जोपासत लातूर पॅटर्न आबाधित ठेवण्यासाठी आवश्यक असणाºया सर्व त्या उपाय योजना करण्यासाठी एकत्रित काम करू, असे आवाहन करून यासाठी शासन व प्रशासन स्तरावर आवश्यक असणारी भूमिका मांडण्यासाठी पुढाकार घेवू अशी ग्वाही अजित पाटील कव्हेकर यांनी यावेळी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande