विधान परिषद निवडणुकीसाठी नांदेडमध्ये काँग्रेसने फुंकले रणशिंग
नांदेड, 24 मे (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवार देण्याची तयारी सुरु करण्यावर काँग्रेसच्या बैठकीत सर्व नगरसेवकांचे एकमत झाले असून काँग्रेसच
विधान परिषद निवडणुकीसाठी नांदेडमध्ये काँग्रेसने फुंकले रणशिंग


नांदेड, 24 मे (हिं.स.)।

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवार देण्याची तयारी सुरु करण्यावर काँग्रेसच्या बैठकीत सर्व नगरसेवकांचे एकमत झाले असून काँग्रेसच्या या निर्णयामुळे विधान परिषद निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे.

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व नगरसेवकांची नायगाव येथे व्यापक बैठक पार पडली. बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. ही निवडणूक काँग्रेसने पुर्ण क्षमतेने लढवावी, या विषयावर उपस्थित सर्वांचे एकमत झाले. त्यासाठी लवकरच पुढील रणनिती ठरविण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर,

माजी महापौर अब्दुल सत्तार, राजेश पावडे, विठ्ठल पावडे, रफीक शेठ, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सत्यपाल सावंत, हनमंतराव राव चव्हाण आदी नगरसेवक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande