बीड : दुचाकीवरून महिलांची सोनसाखळी चोरणारी दाजी-मेहुण्याची टोळी गजाआड
बीड, 24 मे (हिं.स.)।आष्टी परिसरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि आष्टी पोलिसांना मोठे यश आले आहे. या संयुक्त कारवाईत पोलिसांनी दोन अट्टल चोरांना जेरबंद केले
बीड : दुचाकीवरून महिलांची सोनसाखळी चोरणारी दाजी-मेहुण्याची टोळी गजाआड


बीड, 24 मे (हिं.स.)।आष्टी परिसरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि आष्टी पोलिसांना मोठे यश आले आहे. या संयुक्त कारवाईत पोलिसांनी दोन अट्टल चोरांना जेरबंद केले असून प्राथमिक तपासात त्यांनी बीड जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगचे तब्बल ३ गुन्हे कबूल केले आहेत.

आष्टी भागात पायी चालणाऱ्या एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची साखळी शाईन मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरांनी हिसकावून नेली होती. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच त्याच दिवशी परिसरात अशाच आणखी दोन घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील २५ हून अधिक गुन्हेगार वस्त्या आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली. तसेच १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची अत्यंत बारकाईने पडताळणी केली.

या सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी चिखली (ता. आष्टी) येथे छापा टाकून संशयित आरोपी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा त्याचा दाजी याच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी आष्टी पोलिसांच्या स्वाधीन केले असून, त्यांच्याकडून आणखीही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande