शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील काही दिवसापासून पिक विमा जमा होण्यास सुरू
परभणी, 24 मे (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या सन 2024-25 च्या पीक विम्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील काही दिवसापासून पिक विमा जमा होण्यास सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर
अ


परभणी, 24 मे (हिं.स.)।

परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या सन 2024-25 च्या पीक विम्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील काही दिवसापासून पिक विमा जमा होण्यास सुरू झाला आहे.

त्या पार्श्वभूमीवर सोनपेठ तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधवांनी जिजाई निवासस्थानी आमदार राजेश विटेकर यांचासत्कार केला व आभार मानले. हा सत्कार मनाला अक्षरशः भारावून टाकणारा ठरला.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान, त्यांच्या डोळ्यातील आनंद आणि व्यक्त केलेले आभार हे माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या सन्मानापेक्षा अनमोल आहेत.

कारण माझ्यासाठी राजकारण हे केवळ पदासाठी नसून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढण्याचे माध्यम आहे.

आपल्या प्रेमाने आणि विश्वासाने माझ्या जबाबदाऱ्या आणखी वाढवल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभा राहून त्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहणार, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष ॲड. श्रीकांत विटेकर, जिल्हा परिषद सदस्य मदनराव भोसले - विटेकर, मा.जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांतराव देशमुख, सरपंच विलासराव कोकाटे, उपसभापती पद्मसिंह देशमुख यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते..

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande