परभणीत इंधन टंचाईबाबत प्रशासनाद्वारे कमालीचे मौन : वाहनधारकांसह शेतकरी हवालदिल : जनजीवन हळूहळू विस्कळीत
परभणी, 24 मे (हिं.स.)। परभणी महानगरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या चार-सहा दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या उद्भवलेल्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत आश्चर्यकारक असे मौन बाळगले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह स
अ


परभणी, 24 मे (हिं.स.)।

परभणी महानगरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या चार-सहा दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या उद्भवलेल्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत आश्चर्यकारक असे मौन बाळगले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य शेतकरी अक्षरशः हतबल झाला असून इंधन टंचाईने हळूहळू या जिल्ह्याचे जनजीवनसुध्दा विस्कळीत होऊ लागले आहे.

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून इंधन टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राज्य व केंद्र सरकारकडून पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचे यापूर्वी वारंवार स्पष्ट करण्यात येत होते. तरीही प्रत्यक्षात जिल्ह्यात पेट्रोल व विशेषतः डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेदेखील अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे इंधनाचा तुटवडा नसल्याचा दावा ठोकला होता. परंतु, परिस्थिती त्याउलट असल्याचे चित्र सर्वदूर जाणवत होते. गेल्या चार-सहा दिवसांपासून हे चित्र गंभीर होत आहे. बहुतांशी पंपांवर कित्येक किलो मीटरपर्यंत वाहनांच्या व कॅनच्या रांगा आढळल्या. ठिकठिकाणी वाद-विवाद, हमरी-तुमरी व एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकारसुध्दा घडले. या पार्श्वभूमीवर विशेषतः दोन दिवसांपासून बहुतांशी पेट्रोलपंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक झळकल्यानंतर वाहनधारकांसह सर्वसामान्य शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत.

खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मशागतीची कामे सुरु आहेत. शेती मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल गरजेचे आहे. हे डिझेल भरण्याकरीता शेतकरी कॅन घेऊन पेट्रोलपंपांवर दाखल होत आहेत. परंतु, अनेक ठिकाणी कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात होता. आता तर नो स्टॉकचे बोर्ड झळकल्यानंतर शेतकरी हिरमुसले आहेत. तर दुचाकीपासून चारचाकी वाहनधारकांना इंधन मिळत नसल्याने वाहनधारकांतही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून इंधनाच्या या अभूतपूर्व टंचाईमुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळच रोडवली. त्याचा परिणाम रस्ते सामसुम दिसू लागले आहेत. याचाच अर्थ जनजीवन हळूहळू विस्कळीत होवू लागले आहे.

जिल्हाभर अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना पेट्रोलपंप चालक तसेच जिल्हा पुरवठा प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जात नाही, जिल्हाधिका कारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी गेल्या चार दिवसात उद्भवलेल्या या टंचाईच्या पार्श्वभूमीवर ओळीनेसुध्दा खूलासा केला नाही. त्यामुळेच नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशीच परिस्थिती आणखीन एक दोन दिवसा उद्भवल्यास या जिल्ह्यात परिस्थिती चिघळेल, असे स्पष्ट संकेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande