परभणी कोचिंग क्लासेस असोसिएशनची नीट गैरव्यवहारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी
परभणी, 24 मे (हिं.स.)। वैद्यकीय प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण असणार्या नीट युजी - 2026 या परीक्षेत काही महाभागांनी केलेल्या मोठ्या प्रमाणावरील गैर व्यवहाराची संबंधित तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करीत सर्व दोषी व्यक्तींविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी
परभणी कोचिंग क्लासेस असोसिएशनची नीट गैरव्यवहारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी


परभणी, 24 मे (हिं.स.)। वैद्यकीय प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण असणार्या नीट युजी - 2026 या परीक्षेत काही महाभागांनी केलेल्या मोठ्या प्रमाणावरील गैर व्यवहाराची संबंधित तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करीत सर्व दोषी व्यक्तींविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनने जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

संपूर्ण देशभरातील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परिक्षांच्या पार्श्वभूमीवर मोठी मेहनत घेतली. परंतु, पेपरफुटीसारख्या या गैरप्रकाराने विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरल्या गेले. त्यामुळे या प्रकरणात सामील असणार्या सर्व व्यक्तींचा जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणात क्लास संचालक दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी व दिवस-रात्र मेहनत करुन अभ्यास करणार्या लाखो गुणवंतांना दिलासा द्यावा, असे मत या संघटनेचे विभागीय सचिव दिलीप घुंबरे, राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. विष्णू नवपुते, जिल्हाध्यक्ष राजेश रणखांबे, सचिव विश्वंभर काठवटे, अविनाश चक्रवार, प्रा. गणेश काळे, वैभव तेलंग यांच्यासह अन्य सदस्यांनी केली आहे.

या प्रकरणात जलदगतीने तपास व्हावा, भक्कम असे पुरावे गोळा व्हावेत, सर्व दोषी आरोपींना अटक व्हावी, जलदगतीच्या न्यायालयात खटला उभा रहावा व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत या असोसिएशनने केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणकावर आधारीत म्हणजेच ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल, या केलेल्या घोषणेचे स्वागत केले आहे. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा जेईईच्या धर्तीवर नीटने घ्यावी. अनेक परीक्षा स्लॉट ठेवावेत आणि गुणांचे सामान्यीकरण करण्यासाठी पर्सेंटाईल पध्दतीचा वापर करावा, युनियन पब्लीक सर्व्हिस कमिशन प्रमाणे भारतीय राज्य घटनेखालील स्वतंत्र घटनात्मक अशी एजन्सी गठीत करण्याकरीता कायदा करावा, अशीही मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande