परभणी -आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांचे भारतीय जैन संघटनेद्वारे शैक्षणिक पुनर्वसन
परभणी, 24 मे (हिं.स.)।राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील मुला-मुलींच्या शैक्षणिक पुनर्वसनाकरीता भारतीय जैन संघटनेद्वारे महत्वपूर्ण उपक्रम राबविले जात असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील इच्छुक व गरजूंनी या शैक्षणिक पूनर्वसन उपक्रमाचा ला
परभणी -आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांचे भारतीय जैन संघटनेद्वारे शैक्षणिक पुनर्वसन


परभणी, 24 मे (हिं.स.)।राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील मुला-मुलींच्या शैक्षणिक पुनर्वसनाकरीता भारतीय जैन संघटनेद्वारे महत्वपूर्ण उपक्रम राबविले जात असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील इच्छुक व गरजूंनी या शैक्षणिक पूनर्वसन उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक झुंबरलाल रतनलाल मुथा, जिल्हाध्यक्ष सुनील जैन व अक्षय देसरडा यांनी केले आहे.

भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली आत्महत्याग्रस्त शेतकरी व कुटूंबातील मुला-मुलींच्या शैक्षणिक पूनर्वसनासाठी संघटनेद्वारे अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात प्रवेश देऊन त्यांचे शिक्षण, निवास, भोजन, ड्रेस, शैक्षणिक साहित्य तसेच इतर आवश्यक सुविधा पूर्णतः विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. मागील दोन वर्षात आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटूंबातील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये आता प्रवेश घेत असलेल्या मुला मुलींना या प्रकल्पात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांचे बारावी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण संघटनेद्वारे विनामूल्य करण्यात येणार आहे.

यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून शेतकरी कुटूंबातील पात्र विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त करण्यात आली आहे. जैन संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते संबंधित कुटूंबांच्या घरी जावून प्रत्यक्ष भेट घेत आहेत. योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांसह पालकांना समजावून सांगण्यात येत आहे. आपल्या गावात असे कोणी कुटूंब असेल तर त्यांनी 31 मे पूर्वी जिल्हा समन्वयक झुंबरलाल रतनलाल मुथा 94222175752, सुनील जैन - 9421859989, अक्षय देसरडा - 8275950028 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande