
लातूर, 24 मे (हिं.स.)।
शेतीच्या वादातून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा डोक्यात फावडे मारुन खुन करण्यात आल्याची घटना रेणापूर तालुक्यातील घणसरगाव येथे घडली. असल्याची रेणापूर पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ परमेश्वर आमनावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की घणसरगाव येथील मयत मनोहर मानिक आमनावार, मयताचा भाऊ परमेश्वर मानिक आमनावर वय ४० वर्षे रा. घणसरगाव यांच्या शेतालगतच घणसरगाव पाटी ते घणसरगाव दरम्यान गावापासून अर्ध्या किमी अंतरावर आरोपी शिवाजी बाबूराव आमनावर यांचेही शेत आहे. घनसरगाव शिवारातील गट नंबर २६४ मध्ये शेतीच्या वादातून मनोहर आमनावार यांच्या डोक्यात फावडे मारून खून करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली . घणसरगाव ते घणसरगाव पाटी दरम्यान आसलेल्या शेतात शिवाजी बाबूराव आमनावर, गोविंद शिवाजी आमनावर, ज्ञानेश्वर शिवाजी आमनावर, आमनावर, करण गोवर्धन गोपाळ गोपाळ आमनावर, गोजरबाई शिवाजी आमनावार, राणी भ्र गोविंद आमनावार, सोनाली भ्र ज्ञानेश्वर आमनावार, गोपाळ शिवाजी आमनावार, सर्व रा घणसरगाव आदींनी संगणमत करुन मयत मनोहर माणिक आमनावार वय ४५ वर्षे रा घणसरगाव ता रेणापूर जिल्हा लातूर यांच्या डोक्यात फावड्याने मारुन खून केला व हातातील काठ्या फावडे व कुदळीने मयताचा भाऊ परमेश्वर मानिक आमनावार, आई मंगलबाई आमनावार आणि पत्नी राजकन्या आमनावार यांना गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आसल्याची रेणापूर पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ परमेश्वर मानिक आमनावार यांनी फिर्याद दिल्यावरुन एकूण ९ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis