बीड : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १४ जनावरांची सुटका
बीड, 24 मे (हिं.स.)।गेवराई शहरातील साठेनगर येथे कत्तलीच्या उद्देशाने पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या १४ गोवंश जातीच्या जनावरांची गेवराई पोलिसांनी छापा टाकून सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे १ लाख ६० हजार ५०० रुपये किमतीची लहान-मोठी जन
अ


बीड, 24 मे (हिं.स.)।गेवराई शहरातील साठेनगर येथे कत्तलीच्या उद्देशाने पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या १४ गोवंश जातीच्या जनावरांची गेवराई पोलिसांनी छापा टाकून सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे १ लाख ६० हजार ५०० रुपये किमतीची लहान-मोठी जनावरे ताब्यात घेऊन त्यांची पुढील काळजी व संरक्षणासाठी गोशाळेत रवानगी केली आहे.

पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी याने स्वतःच्या जागेत चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता जनावरांना दाटीवाटीने डांबून ठेवले होते. पोलिसांनी छापा टाकून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. करण्यात आलेली ही कारवाई पोलिस निरीक्षक किशोर पवार, सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ, उपनिरीक्षक राम खोत यांच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande