बीड : धनेगाव येथे वादळी वाऱ्यामुळे कारवर झाड कोसळले; वाहनाचे मोठे नुकसान
बीड, 24 मे (हिं.स.)।केज तालुक्यातील युसुफवडगाव महसूल मंडळात अचानक कडाक्याच्या वादळासह आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसाचा मोठा फटका धनेगाव परिसराला बसला असून, येथे उभ्या असलेल्या एका कारवर अचानक मोठे झाड कोसळल
बीड : धनेगाव येथे वादळी वाऱ्यामुळे कारवर झाड कोसळले; वाहनाचे मोठे नुकसान


बीड, 24 मे (हिं.स.)।केज तालुक्यातील युसुफवडगाव महसूल मंडळात अचानक कडाक्याच्या वादळासह आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसाचा मोठा फटका धनेगाव परिसराला बसला असून, येथे उभ्या असलेल्या एका कारवर अचानक मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत कार झाडाखाली दबली गेल्याने वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या परिसरात वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, रोहित्र पडले असून घरांचे पत्रेही उडून गेले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande