लातूरच्या युवा विधिज्ञ ॲड. रुद्राली पाटील चाकुरकर यांची अधिवक्ता म्हणून नियुक्ती
लातूर, 24 मे (हिं.स.)। येथील युवा विधिज्ञ ॲड. रुद्राली पाटील चाकुरकर यांची सर्वोच्च न्यायालयातील Supreme Court Legal Services Committee च्या नवीन पॅनेलवर अधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्
रूद्राली पाटील चाकूरकर


लातूर, 24 मे (हिं.स.)।

येथील युवा विधिज्ञ ॲड. रुद्राली पाटील चाकुरकर यांची सर्वोच्च न्यायालयातील Supreme Court Legal Services Committee च्या नवीन पॅनेलवर अधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कायदे क्षेत्रातील अभ्यासू वृत्ती, प्रभावी युक्तिवाद आणि सामाजिक बांधिलकी यामुळे ॲड. रुद्राली पाटील चाकुरकर यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लीगल सर्व्हिसेस कमिटीच्या पॅनेलवर निवड होणे ही अत्यंत प्रतिष्ठेची बाब मानली जाते.

यापूर्वीही विविध महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी प्रभावी बाजू मांडली असून दिल्ली उच्च न्यायालयातील काही चर्चित प्रकरणांतही त्यांनी काम पाहिले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल विधी क्षेत्र, सामाजिक वर्तुळ तसेच लातूर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande