नांदेड पोलिसांनी सुरू केलेल्या 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' मोहिमेला यश
नांदेड, 24 मे (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी सुरू केलेल्या ''ऑपरेशन क्रॅकडाऊन'' मोहिमेला मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई करत तब्बल ७०३ अवैध शस्त्रे
नांदेड पोलिसांनी सुरू केलेल्या 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' मोहिमेला यश


नांदेड, 24 मे (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी सुरू केलेल्या 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' मोहिमेला मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई करत तब्बल ७०३ अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे १४ लाख ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी म्हणून याचे नाव समोर आले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध शस्त्र बाळगणारे व विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

गुप्त माहितीआधारे छापा

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, गुरुद्वारा गेटजवळ जाणाऱ्या रस्त्यावरील ३०० स्क्वेअर शॉपिंग प्लाझा येथील दुकान क्रमांक ०८ मध्ये आरोपी हा विनापरवाना तलवारी, खंजर, दोन्ही बाजूंनी धार असलेली घातक शस्त्रे आणि फायटर/पंच विक्रीसाठी ठेवून आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला.

४७० तलवारी किंमत : १२ लाख ३१ हजार रुपये, २०९ खंजर/चाकू किंमतः१ लाख ७० हजार ९०० रुपये. २४ फायटर/पंच किंमतः २४ हजार रुपये, असा एकूण १४ लाख ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande