सोलापूर - आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेंतर्गत शिक्षकांना कॅशलेस उपचार
सोलापूर, 24 मे (हिं.स.)। राज्यातील 100 टक्के अनुदानित खासगी शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत कार्ड काढणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्देश शिक्षण उपसंचालकांकडून जारी करण्यात आले असून, संबंधित क
सोलापूर - आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेंतर्गत शिक्षकांना कॅशलेस उपचार


सोलापूर, 24 मे (हिं.स.)। राज्यातील 100 टक्के अनुदानित खासगी शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत कार्ड काढणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्देश शिक्षण उपसंचालकांकडून जारी करण्यात आले असून, संबंधित कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणिमहात्मा फुले जनआरोग्य योजनाअंतर्गत कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.या योजनेंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. त्यासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड काढणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वेतन पथकांना अधिकृत पत्र पाठविले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व 100 टक्के अनुदानित खासगी शाळांतील कर्मचाऱ्यांचा या आरोग्य योजनेत समावेश करण्यात आला आहे.दरम्यान,सचिन जगतापयांनीही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर आयुष्मान भारत कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले आहे. शासनाकडून यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले असून, सर्व संबंधितांनी त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande