परभणी - काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीवर आक्षेप
परभणी, 24 मे (हिं.स.)परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबाजानी दुर्राणी यांच्या केलेल्या नियुक्तीवर काँग्रेस कमिटीचे सचिव रविंद्र सोनकांबळे यांनी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना सोनकां
परभणी - काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीवर आक्षेप


परभणी, 24 मे (हिं.स.)परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबाजानी दुर्राणी यांच्या केलेल्या नियुक्तीवर काँग्रेस कमिटीचे सचिव रविंद्र सोनकांबळे यांनी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना सोनकांबळे यांनी पाठविलेल्या पत्रातून काही गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. विशेषतः दुर्राणी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात कार्यरत होते. तेथून ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु, पाथरी नगरपालिका निवडणूकीत ते स्वतःच्या नेतृत्वाची कोणतीही चुणूक दाखवू शकले नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली पाथरी नगरपालिका गमवावी लागली. त्याच पाथरी पालिकेत स्विकृत सदस्य म्हणूनसुध्दा ते जावून बसले आहेत. त्यामुळे सच्च्या कार्यकर्त्यावर खूलेआमपणे अन्याय झाला आहे, असे मत प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सोनकांबळे यांनी व्यक्त केले.

जिल्हाध्यक्ष या नात्याने ते या जिल्ह्यात कार्यरत होते. परंतु, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूकीत या जिल्ह्यात काँग्रेसजणांना पराभवाचा मोठा सामना करावा लागला. परभणी महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती. 32 नगरसेवक होते. परंतु, ते संख्याबळ आता 12 वर आले आहे. त्यास कारण म्हणजे दुर्राणी यांचे एकतर्फी नेतृत्व आहे, असे सोनकांबळे यांनी नमूद कले. दुर्राणी यांच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोष आहे. त्यांच्यात व कार्यकर्त्यात मोठे अंतर आहे. विशेषतः त्यांच्याविरोधात अनंत गुन्हेसुध्दा दाखल झाले आहेत, असे सोनकांबळे यांनी या पत्रातून नमूद केले व जिल्हाध्यक्ष दुर्राणी यांची उचलबांगडी करावी व अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande