परभणीतील पेडगांव फाट्यावर जलद बस गाड्यांना थांबा द्या, संतप्त नागरिकांची मागणी
परभणी, 24 मे (हिं.स.)राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्या परभणी ते मानवत या रस्त्यावरील पेडगांव फाट्यावर जलद बस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी पेडगावच्या संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. पाथरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. विशेषतः या
परभणीतील पेडगांव फाट्यावर जलद बस गाड्यांना थांबा द्या, संतप्त नागरिकांची मागणी


परभणी, 24 मे (हिं.स.)राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्या परभणी ते मानवत या रस्त्यावरील पेडगांव फाट्यावर जलद बस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी पेडगावच्या संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. पाथरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. विशेषतः या रस्त्यावर दंत महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, संशोधन केंद्र अन्य शैक्षणिक संस्था, स्पर्धा परिक्षा केंद्र, बँका वगैरे अनेक गोष्टी कार्यरत आहेत. अशा या वर्दळीच्या रस्त्यावर पेडगांव फाट्यालगत 20 ते 25 खेडी संलग्न आहेत. याही खेड्यातील ग्रामस्थांसह हजारो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पेडगांव फाटा महत्वपूर्ण थांबा आहे. हसनापुर, जांब, गव्हा, मोहपुरी, आळंद, देऊळगाव आवचार, मांडाखळी, उमरी, साबळे भोगाव, पानेर, किन्होळा, वडगाव, सय्यद मिया पिंळगाव, काष्टगाव, दुधनगाव, गायकी पिंपळगाव, शेवडी, चिमणगाव, एकरुखा, गोविंदपूरवाडी, रणेरवाडी, इस्माईलपुर, आर्वी, तूळजापुर, शहापुर वगैरे गावांना या फाट्याद्वारेच ये-जा करण्याचा मार्ग आहे. पण, या फाट्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या जलद बसेस थांबत नाहीत. परभणी आगाराची फक्त परभणी - सेलू ही बस रिकामी असली तर थांबते तर कधी रिकामी असूनसुध्दा थांबत नाही. नांदेड, बीड, कळमनुरी, हिंगोली वगैरे आगाराच्या बसेस तर थांबतच नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने दामदुप्पट रक्कम अदा करुन धोकादायकरीत्या खाजगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागतो आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande