मध्य रेल्वेची सर्वाधिक कमाई करणाऱ्या गाड्यांमध्ये पुणे-अजनी वंदेभारत आघाडीवर
पुणे, 24 मे (हिं.स.)। पुणे-अजनी (नागपूर) वंदेभारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या नऊ महिन्यांत या सेवेने रेल्वेला 20 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवून दिले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा यादी वाढत असल्याने या गाडीमध
vande


पुणे, 24 मे (हिं.स.)। पुणे-अजनी (नागपूर) वंदेभारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या नऊ महिन्यांत या सेवेने रेल्वेला 20 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवून दिले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा यादी वाढत असल्याने या गाडीमध्ये अतिरिक्त डबे वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पुणे-अजनी वंदेभारत सेवा 10 ऑगस्ट 2025 रोजी सुरू करण्यात आली होती. आठवड्यातील सहा दिवस धावणारी ही गाडी खासगी ट्रॅव्हल्स आणि वाहनांच्या तुलनेत प्रवाशांना अवघ्या 12 तासांत नागपूरपर्यंतचा जलद आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देत आहे.रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे दीड लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. सण-उत्सव, उन्हाळी सुट्ट्या आणि दिवाळी काळात या गाडीचे बुकिंग 145 टक्क्यांहून अधिक झाल्याने तिची लोकप्रियता अधोरेखित झाली आहे.सध्या या वंदेभारत एक्सप्रेसमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लासचा एक आणि चेअर कारचे सात असे एकूण आठ डबे आहेत. ही गाडी अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ आणि अकोला मार्गे धावत असून मध्य रेल्वेसाठी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या गाड्यांपैकी एक ठरली आहे.गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा (अमरावती) आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे-नागपूर खासगी बसचे तिकीट दर 4 ते 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचतात. त्याच्या तुलनेत वंदेभारत एक्सप्रेसमधून सुमारे 2,800 ते 3,800 रुपयांत वातानुकूलित, सुरक्षित आणि जलद प्रवास करता येत असल्याने प्रवासी या सेवेचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande