पुण्यात भाजपकडे 333 मतांचे संख्याबळ; राष्ट्रवादीसोबत अंतर्गत संघर्षाची चिन्हे
पुणे, 24 मे (हिं.स.)। पुणे विधानपरिषदेच्या रिक्त जागेवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली असून, ही जागा भाजपकडेच राहावी यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या
BJP COngress


पुणे, 24 मे (हिं.स.)।

पुणे विधानपरिषदेच्या रिक्त जागेवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली असून, ही जागा भाजपकडेच राहावी यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.पुणे महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पक्षाकडे सुमारे ३३३ मतदारांचे भक्कम संख्याबळ असल्याचा दावा करत ही जागा भाजपलाच देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.

ईईविधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, भाजपकडून या जागेवर ठाम दावा केला जात आहे. स्थानिक नेतृत्वाने पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली असून, भाजप कार्यकर्त्यांमध्येही ही जागा पक्षानेच लढवावी, असा सूर उमटत आहे.पत्रकारांशी बोलताना गणेश बिडकर म्हणाले की, “पुण्यात भारतीय जनता पक्षाचे एकट्याचेच ३०० हून अधिक मतदार आहेत. अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांची साथ मिळाल्यास हे संख्याबळ आणखी वाढते. त्यामुळे ही जागा भाजपनेच लढवावी, असा पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये ठाम मतप्रवाह आहे.”दरम्यान, पुण्याची जागा पारंपरिकरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात असताना, भाजपने संख्याबळाच्या आधारावर आक्रमक भूमिका घेतल्याने महायुतीतील अंतर्गत समीकरणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande