सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर मोर्चाचा इशारा
सोलापूर, 24 मे (हिं.स.)। राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात सदाशिव बेडगे यांनी मुंबई पोलिस उपायुक्तांकडे मो
सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर मोर्चाचा इशारा


सोलापूर, 24 मे (हिं.स.)।

राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात सदाशिव बेडगे यांनी मुंबई पोलिस उपायुक्तांकडे मोर्चासाठी परवानगी मागितली आहे.सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या निवेदनानुसार, राज्यातील सुमारे 11 हजार 155 सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये 20 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून ते अत्यल्प वेतनावर काम करत आहेत. कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, ग्रंथालयांना मिळणाऱ्या 40 टक्के अनुदानामध्ये वाढ करावी तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.या मागण्यांसाठी यापूर्वी 11 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन आणि मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, शासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने ग्रंथालय कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या काळात मोठ्या संख्येने कर्मचारी विधानभवनावर मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचा इशाराही परिषदेकडून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande