माळेगाव ते चोंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रथयात्रा २७ मे रोजी रवाना होणार
नांदेड, 24 मे (हिं.स.) माळेगाव ते चोंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रथयात्रा २७ मे रोजी रवाना होणार आहे. यात्रेत जवळपास ४०० जण सहभागी होत असून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक
माळेगाव ते चोंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रथयात्रा २७ मे रोजी रवाना होणार


नांदेड, 24 मे (हिं.स.)

माळेगाव ते चोंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

रथयात्रा २७ मे रोजी रवाना होणार आहे. यात्रेत जवळपास ४०० जण सहभागी होत असून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाण यांच्या वतीने श्री क्षेत्र माळेगाव (खंडोबा यात्रा) ते श्री क्षेत्र चोंडी अशी १२ वी दिंडी रथयात्रा दिनांक २७ मे ते ३१ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव, ता. लोहा जि. नांदेड येथून पुण्यश्लोक अहिल्यामातेचे जन्मस्थळ श्री क्षेत्र चोंडी, ता. जामखेड जि. अहिल्यानगर येथे भक्तिमय वातावरणात रथयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान विविध धार्मिक व ऐतिहासिक तीर्थस्थळांना भेट

देण्यात येणार असून, त्यामध्ये परचंडा हनुमान मंदिर, परळी वैजनाथ मंदिर, मुकुंदराज समाधी स्थळ, अंबामाता मंदिर, चाकरवाडी, मन्मथस्वामी, अहिल्या सृष्टी आणि अहिलेश्वर महादेव मंदिर या स्थळांचा समावेश आहे.

यात्रेदरम्यान भजन, कीर्तन, व्याख्यान व सत्संग यांचे आयोजन करण्यात आले आहेत. या रथयात्रेचे नेतृत्व नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धूळगंडे हे करीत आहेत. तसेच यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन ज्येष्ठ विधीज्ञ व अध्यक्ष अॅड. शिवाजीराव हाके, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मुरहरी कुंभारगावे, साईकिरण सलगरे, सचिव इंजि. बालाजी काळे, महिला प्रतिनिधी कांचन शेळके, रथ सारथी पांडुरंग धूळगुंडे, तसेच पिराजी ना. धुळगंडे, बालाजी वडजे, सखाराम शेवरे, निळकंठ उराडे, एकनाथ उराडे, लक्ष्मण धुळगंडे, कुसुम गि. पगडे, प्रा. संजीव म्हेत्रे आणि परसराम वडजे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande