परभणी - पाथरी रस्त्यावरील मनोरंजनाच्या नावाखाली सुरु असलेला जुगार त्वरित बंद करण्याची मागणी
परभणी, 24 मे (हिं.स.)।परभणी येथील पाथरी रस्त्यावरील एका संस्थेमार्फत मनोरंजनाच्या नावाखाली खूलेआमपणे सुरु असलेला जूगार त्वरित बंद करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुर्तजा उर्फ रहेबर सय्यद जिलानी यांनी केली आहे. या मनोरंजन केंद्रा
परभणी - पाथरी रस्त्यावरील मनोरंजनाच्या नावाखाली सुरु असलेला जुगार त्वरित बंद करण्याची मागणी


परभणी, 24 मे (हिं.स.)।परभणी येथील पाथरी रस्त्यावरील एका संस्थेमार्फत मनोरंजनाच्या नावाखाली खूलेआमपणे सुरु असलेला जूगार त्वरित बंद करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुर्तजा उर्फ रहेबर सय्यद जिलानी यांनी केली आहे. या मनोरंजन केंद्राच्या चालकाने जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करीत परवाना हस्तगत केला आहे. त्या मार्फत संस्थेच्या सदस्याकरीता मनोरंजन म्हणून सरळ या केंद्राद्वारे जूगार अड्डा चालविला जात आहे. पाथरी रस्त्यावरील या जूगार अड्ड्यामुळे या भागातील कायदा व सुव्यवस्था बाबत संपूर्ण वातावरण सातत्याने बिघडत आहे. या भागात दोन वैद्यकीय महाविद्यालय आहेत. तसेच मंगल कार्यालये आहेत. प्रार्थनास्थळ आहेत. अशा या संवेदनशील भागात या पध्दतीचे जूगार अड्डे सुरु ठेवून सर्वसामान्य नागरीकांचे जीवन उध्वस्त करणे हे पूर्णतः गैर आहे, असे सय्यद मुर्तजा यांनी नमूद केले. प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande