
सोलापूर, 24 मे (हिं.स.)।
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत एम. राज कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शांतता, सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीलावसीम बुऱ्हाण, पोलीस उपायुक्तप्रितम यावलकर,डॉ. अश्विनी पाटीलयांच्यासह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बकरी ईदचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी आवश्यक उपाययोजना, वाहतूक, सुरक्षा आणि नागरिकांच्या सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रशासन आणि नागरिकांनी परस्पर समन्वय ठेवून सण सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावा, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड