वाशिमचे उबाठा जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
मुंबई, 24 मे (हिं.स.)। वाशिमचे उबाठा जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांच्यासह दीडशे पदाधिकाऱ्यांनी रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला
Bjp


मुंबई, 24 मे (हिं.स.)। वाशिमचे उबाठा जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांच्यासह दीडशे पदाधिकाऱ्यांनी रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलंगे आणि आमदार शामभाऊ खोडे उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेऊन या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राष्ट्राला परमवैभव प्राप्त देणारा हा पक्ष कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी काम करत आहे. समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहील अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली.

यावेळी सुरेश मापारी म्हणाले की, आता ट्रेलर सुरू झाला आहे. पिक्चर अजून बाकी आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेऊन उबाठा गटाचे तमाम पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहोत. वाशिम जिल्ह्यात कोणतेही काम आपण करण्यास मदत करू असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. यापुढील काळात पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवण्यात येईल ती आम्ही निष्ठेने पार पाडू.

यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख नगरसेवक नितीन मडके, उपनगराध्यक्ष राजू भांदुर्गें, युवा सेना शहर प्रमुख आशीष इंगोले, माजी नगरसेवक राजू भाऊ घोडीवाले, हेमलता इंगळे, सागर गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद पट्टेबहादूर, माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी पट्टेबहादूर, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक धनंजय गोरे, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे नंदकिशोर भोयर, हिराभाई जाणीवाले, माजी पंचायत समिती सभापती तुकाराम काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवदास पाटील राऊत, सुरेश कर्हे, सचिन डोफेकर यांच्यासह दीडशे पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande