परभणी - रेपा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
परभणी, 24 मे (हिं.स.)जिंतूर तालुक्यातील रेपा येथे एका तरुणाने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली. अंकुश माधवराव मस्के (वय 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना निदर्शनास आली. घटनेची माहित
परभणी - रेपा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


परभणी, 24 मे (हिं.स.)जिंतूर तालुक्यातील रेपा येथे एका तरुणाने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली. अंकुश माधवराव मस्के (वय 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने बोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात नोंद प्रक्रिया सुरू असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मृत अंकुश मस्के यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा व परिवार असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे रेपा गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande