प्रत्येक समाजाने पुढाकार घेऊन 'युवा संस्कार शिबिरे' आयोजित करावीत : राजू शेट्टी
कोल्हापूर, 24 मे (हिं.स.)। सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आणि आधुनिकतेच्या युगात ''व्यसनाधीनता'' ही समाजासमोरील सर्वात मोठी आणि चिंताजनक समस्या बनली आहे. या जीवघेण्या विळख्यातून तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी आणि एक सुजाण, संस्कारीत समाज घडवण्यासाठी
सम्यक ज्ञान विद्या संस्कार शिबिरात बोलताना राजू शेट्टी


कोल्हापूर, 24 मे (हिं.स.)। सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आणि आधुनिकतेच्या युगात 'व्यसनाधीनता' ही समाजासमोरील सर्वात मोठी आणि चिंताजनक समस्या बनली आहे. या जीवघेण्या विळख्यातून तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी आणि एक सुजाण, संस्कारीत समाज घडवण्यासाठी प्रत्येक समाजाने पुढाकार घेऊन 'युवा संस्कार शिबिरे' आयोजित करणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी बाहुबली येथे झालेल्या सम्यक ज्ञान विद्या संस्कार शिबिरात बोलताना केले.

आजची तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. मात्र, नैराश्य, चुकीची संगत, सोशल मीडियाचा अतिवापर आणि पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण यामुळे अनेक तरुण अंमली पदार्थ, दारू आणि इतर घातक व्यसनांच्या आहारी जात आहेत. यामुळे केवळ एका व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होत नसून संपूर्ण कुटुंब आणि समाज पोळला जात आहे. ही परिस्थिती वेळीच न सावरल्यास मानवी मूल्यांचा ऱ्हास होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या गंभीर समस्येवर केवळ शासकीय कायदे किंवा पोलीस कारवाई पुरेशी नाही कारण व्यवस्थेने त्यांची अवस्था दात नसलेल्या वाघासारखे करून ठेवलेली आहे. यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर व्यापक प्रयत्नांची गरज आहे. प्रत्येक समाज घटकाने आपापल्या भागात तरुण-तरुणींसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले पाहिजे.शांती विद्या ज्ञानसंवर्धन समितीने यावर्षी दहा दिवसांच्या कालावधीत १२०० हून अधिक युवक व युवती यांच्यावर संस्कार शिबीरातून धर्म संस्कार , व्यसनमुक्ती , मानसिक आरोग्य आणि अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि कौटुंबिक संस्कार या माध्यमातून रूजविण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande