छ. संभाजीनगर : बाजार समितीचे सभापती, उपसभापतींवर मारहाणीचा गुन्हा
छत्रपती संभाजीनगर, 25 मे (हिं.स.) : कृषी उत्पन्न बाजार समितीत परवाना नूतनीकरणाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्याविरुद्ध कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
छ. संभाजीनगर : बाजार समितीचे सभापती, उपसभापतींवर मारहाणीचा गुन्हा


छत्रपती संभाजीनगर, 25 मे (हिं.स.) : कृषी उत्पन्न बाजार समितीत परवाना नूतनीकरणाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्याविरुद्ध कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ज्ञानेश्वर हरिश्चंद्र भुसारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बाजार समिती कार्यालयात परवाना नूतनीकरणासंदर्भात माहिती विचारण्यासाठी गेले असता, दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या घटनेनंतर संबंधित व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande