
नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.)। गोल्ड ज्वेलरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या यशस्वी ज्वेलर्सचा ४३.८८ कोटी रुपयांचा आयपीओ
सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला. या आयपीओसाठी २७ मेपर्यंत बोली लावता येणार आहे. इश्यू बंद झाल्यानंतर २९ मे रोजी शेअर्सचे अलॉटमेंट केले जाणार असून, १ जून रोजी अलॉट झालेल्या शेअर्स डीमॅट खात्यात जमा केले जातील. कंपनीचे शेअर्स २ जून रोजी बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
या आयपीओसाठी प्रति शेअर ८३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली असून, लॉट साइज १,६०० शेअर्सचा आहे. रिटेल गुंतवणूकदारांना किमान दोन लॉट म्हणजेच ३,२०० शेअर्ससाठी बोली लावावी लागणार असून, त्यासाठी २,६५,६०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या आयपीओअंतर्गत १० रुपये फेस व्हॅल्यू असलेले एकूण ५२,८६,४०० शेअर्स जारी करण्यात येत आहेत. त्यापैकी २,६७,२०० नवे शेअर्स मार्केट मेकरसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी ४७.५२ टक्के हिस्सा आणि नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) यांच्यासाठी ४७.४३ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय मार्केट मेकरसाठी ५.०५ टक्के हिस्सा राखीव आहे. या इश्यूसाठी स्मार्ट होरायझन कॅपिटल अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड यांची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रेणी शेअर्स लिमिटेड ही कंपनीची मार्केट मेकर आहे.
यशस्वी ज्वेलर्सच्या आर्थिक स्थितीबाबत बोलायचे झाल्यास, कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबीकडे सादर करण्यात आलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) मधील दाव्यानुसार कंपनीची आर्थिक स्थिती सातत्याने मजबूत होत गेली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला १.९६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तो पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वाढून ११.२८ कोटी रुपये झाला आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये झपाट्याने वाढून १८.२८ कोटी रुपयांवर पोहोचला. याच कालावधीत कंपनीच्या महसुलातही सातत्याने वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला २००.९३ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले होते. ते २०२४-२५ मध्ये वाढून २९७.७६ कोटी रुपये झाले आणि २०२५-२६ मध्ये मोठी झेप घेत ४४९.७४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.
मात्र, या काळात कंपनीवरील कर्जाचाही बोजा सातत्याने वाढत गेला. आर्थिक वर्ष २०२३-२४ अखेरीस कंपनीवर १६.२५ कोटी रुपयांचे कर्ज होते. ते २०२४-२५ मध्ये वाढून ४३.११ कोटी रुपये झाले आणि २०२५-२६ मध्ये आणखी वाढून ६५.३६ कोटी रुपयांवर पोहोचले. या कालावधीत कंपनीच्या नेटवर्थमध्येही वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीची नेटवर्थ ८.७५ कोटी रुपये होती. ती २०२४-२५ मध्ये वाढून २४.१५ कोटी रुपये झाली. त्यानंतर २०२५-२६ मध्ये कंपनीची नेटवर्थ ४३.४८ कोटी रुपयांवर पोहोचली. कंपनीच्या रिझर्व्ह आणि सरप्लसबाबतही कंपनीने चांगली वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये हा आकडा ३.८३ कोटी रुपये होता. तो २०२४-२५ मध्ये वाढून ११.९० कोटी रुपये झाला. त्यानंतर २०२५-२६ मध्ये कंपनीचे रिझर्व्ह आणि सरप्लस ३१.१५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.
तसेच कंपनीचे ईबीआयटीडीए (अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४.९५ कोटी रुपये होते. ते २०२४-२५ मध्ये वाढून १८.३३ कोटी रुपये झाले आणि २०२५-२६ मध्ये २९.८८ कोटी रुपयांवर पोहोचले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule