बकरी ईद, लव्ह जिहाद आणि हिंदुत्वावर नितेश राणेंची सणसणीत टीका
नेरळच्या हिंदू संमेलनात नितेश राणे यांचे आक्रमक भाषण रायगड, 24 मे (हिं.स.) : नेरळ येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात राज्याचेे मंत्री नितेश राणे यांनी हिंदुत्व, गोसंरक्षण, धर्मांतर, मदरसे आणि हिंदू समाजाच्या सुरक्षेसंदर्भात आक्रमक भूमिका मांडली.
Nitesh-Ranes-festive-comment-


Nitesh-Ranes-festive-comment-


Nitesh-Ranes-festive-comment-


नेरळच्या हिंदू संमेलनात नितेश राणे यांचे आक्रमक भाषण

रायगड, 24 मे (हिं.स.) : नेरळ येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात राज्याचेे मंत्री नितेश राणे यांनी हिंदुत्व, गोसंरक्षण, धर्मांतर, मदरसे आणि हिंदू समाजाच्या सुरक्षेसंदर्भात आक्रमक भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी हिंदू समाजाने एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. “कोणत्याही हिंदूकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर तो शुक्रवारी परत जाणार नाही,” असे विधान करत त्यांनी कठोर इशारा दिला. तसेच “जर कोणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या वेळी येथे तांडव करू,” असेही ते म्हणाले.

राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्याचे सांगत त्यांनी “जास्त फडफड केली तर पाकिस्तानात पाठवू,” असे वक्तव्य केले. हिंदू समाजाला उद्देशून ते म्हणाले, “तुम्ही फक्त एकजूट दाखवा, तुम्हाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझी असेल.”

गोसंरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी गोमातांचे संरक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव व्हावा, अशी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी “किस पे कितना है दम” हे दाखवण्याची वेळ हिंदूंवर आल्याचे सांगितले. “आमच्या वाटेला कोणी गेले तर आम्ही त्याला परत घरी जाऊ देणार नाही,” असेही त्यांनी म्हटले.

धर्म आणि सहिष्णुतेच्या विषयावर बोलताना हिंदू धर्म सर्व धर्मांचा सन्मान करायला शिकवतो, असे त्यांनी सांगितले. मात्र काही धर्मग्रंथांमध्ये इतर धर्म संपवण्याची शिकवण दिली जाते, असा आरोपही त्यांनी केला.

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी हिंदू सणांना विरोध करणाऱ्यांवर टीका केली आणि विनायक दामोदर सावरकरांच्या विचारांचा उल्लेख केला. “हिंदूंना मुसलमानांपासून नाही, तर काही हिंदूंपासून धोका आहे,” असेही ते म्हणाले.

यासोबतच

भिवंडीतील पडघा परिसराचा उल्लेख करत त्यांनी लोकसंख्या वाढ, धर्मांतर आणि “लव्ह जिहाद” या मुद्द्यांवर भाष्य केले. काही लोक योजनाबद्ध पद्धतीने संख्या वाढवत असून हिंदू मुलींना जाळ्यात अडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande