भारतीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज, पहिला सामना २६ मे रोजी
र्थप, २५ मे (हिं.स.)भारतीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बहुप्रतिक्षित चार सामन्यांची मैत्रीपूर्ण मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी एफआयएच महिला हॉकी नेशन्स कप न्यूझीलंड २०२५-२६ च्या तयारीसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो. मालिकेतील पह
कर्णधार सलीमा टेटे


र्थप, २५ मे (हिं.स.)भारतीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बहुप्रतिक्षित चार सामन्यांची मैत्रीपूर्ण मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी एफआयएच महिला हॉकी नेशन्स कप न्यूझीलंड २०२५-२६ च्या तयारीसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो. मालिकेतील पहिला सामना २६ मे रोजी पर्थ हॉकी स्टेडियमवर खेळला जाईल.

या वर्षाच्या सुरुवातीला अर्जेंटिना दौऱ्यातील उत्कृष्ट कामगिरीनंतर भारतीय संघ आत्मविश्वासाने भारलेला आहे. भारताने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिनाविरुद्ध चार सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. पहिले दोन सामने गमावल्यानंतर, भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत आपली क्षमता दाखवून दिली.

मुख्य प्रशिक्षक स्योर्ड मारिन यांच्या देखरेखीखाली, भारतीय संघाने गेल्या काही आठवड्यांत साई बंगळूरु येथे आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात कसून तयारी केली आहे. खेळाडूंनी रणनीतिक सराव, पेनल्टी कॉर्नरचे संयोजन, तंदुरुस्ती आणि सुनियोजित खेळावर लक्ष केंद्रित केले.

संघाची कर्णधार सलीमा टेटे या दौऱ्याबद्दल म्हणाली, संपूर्ण संघ या दौऱ्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते आणि सध्या आम्हाला नेमक्या याच आव्हानाची गरज आहे. पर्थमधील प्रत्येक सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. ती पुढे म्हणाली, आम्हाला ऑकलंडमधील नेशन्स कपमध्ये आत्मविश्वासाने आणि सकारात्मक गतीने प्रवेश करायचा आहे. ऑस्ट्रेलिया आम्हाला आमच्या क्षमतेच्या मर्यादेपर्यंत आव्हान देईल आणि आम्हाला या संधीचा उपयोग स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी करायचा आहे.

२२ सदस्यीय भारतीय संघात अनुभव आणि युवा खेळाडूंचा उत्तम मिलाफ आहे. सोनम, हीना बानो आणि लालथंथलुंगी यांसारख्या युवा खेळाडूही आपली छाप सोडण्यास सज्ज आहेत. एफआयएच जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेला भारतीय संघ, आठव्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियन संघाला कडवे आव्हान देण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande