श्रीराम जनरल इन्शुरन्स आणि पिरामल फायनान्स यांच्यात धोरणात्मक भागीदारीसाठी हातमिळवणी
* संपूर्ण भारतात आर्थिक संरक्षण आणि विमा सुलभता बळकट करण्याचे उद्दिष्ट मुंबई, 25 मे (हिं.स.) : श्रीराम जनरल इन्शुरन्स (SGI) ने आज पिरामल फायनान्स या भारतातील किरकोळ वित्तपुरवठ्यावर (रिटेल-फोकस्ड) लक्ष केंद्रित करणाऱ्या एका अग्रगण्य ''अप्पर-लेयर N
श्रीराम जनरल इन्शुरन्स पिरामल फायनान्स


* संपूर्ण भारतात आर्थिक संरक्षण आणि विमा सुलभता बळकट करण्याचे उद्दिष्ट

मुंबई, 25 मे (हिं.स.) : श्रीराम जनरल इन्शुरन्स (SGI) ने आज पिरामल फायनान्स या भारतातील किरकोळ वित्तपुरवठ्यावर (रिटेल-फोकस्ड) लक्ष केंद्रित करणाऱ्या एका अग्रगण्य 'अप्पर-लेयर NBFC' (बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी) सोबत एका धोरणात्मक 'कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी'ची घोषणा केली. या भागीदारीचा उद्देश, विशेषतः निम-शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये, विमा सेवांची उपलब्धता सुधारणे हा आहे.

या भागीदारी अंतर्गत, SGI पिरामल फायनान्सच्या शाखांच्या विस्तृत जाळ्याचा आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेचा (customer outreach) लाभ घेईल. याद्वारे, SGI आपल्या विविध प्रकारच्या विमा उत्पादने पिरामल फायनान्सच्या २६ राज्यांमध्ये पसरलेल्या ७०१ शाखांमधून आणि १३,००० हून अधिक पिन कोड क्षेत्रांमध्ये उपलब्ध करून देईल.

ही भागीदारी दोन्ही संस्थांची एक सामायिक वचनबद्धता दर्शवते. याद्वारे ग्राहकांसाठी विमा सेवा अधिक सुलभ आणि अर्थपूर्ण बनवणे, त्यांची मालमत्ता, उपजीविका आणि दीर्घकालीन आर्थिक कल्याण सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. श्रीराम जनरल इन्शुरन्सचा विमा क्षेत्रातील दीर्घकालीन अनुभव, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि गेल्या अनेक वर्षांत त्यांनी कमावलेला विश्वास; तसेच पिरामल फायनान्सचा नाविन्यपूर्ण 'हाय-टेक + हाय-टच' दृष्टिकोन या दोन्हींचा संगम साधून, विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये संरक्षणात्मक सेवांची अखंड उपलब्धता तयार करणे हे उद्दिष्ट दोन्ही कंपन्यांनी धोरणात्मक भागीदारी करताना ठेवले आहे.

या भागीदारीबद्दल बोलताना, पिरामल फायनान्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO), श्री. जयराम श्रीधरन म्हणाले: आमच्या ग्राहकांपर्यंत, विशेषतः निम-शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये, विमा सेवांची पोहोच विस्तारण्यासाठी श्रीराम जनरल इन्शुरन्ससोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतातील अनेक भागांमध्ये, विशेषतः लहान शहरांमध्ये, विम्याचा प्रसार (penetration) अजूनही कमी आहे. त्यामुळेच अधिक साध्या आणि सर्वसमावेशक संरक्षणात्मक सेवांची नितांत गरज आहे. आमच्या अनेक ग्राहकांसाठी, एखादी अचानक उद्भवलेली अनपेक्षित घटना संपूर्ण कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या खूप मागे नेऊ शकते. म्हणूनच, विमा हे केवळ एक 'उत्पादन' नसून, ग्राहकांनी आपल्या कष्टाने उभारलेली संपत्ती आणि भविष्य सुरक्षित ठेवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून, आमच्या विस्तृत शाखा जाळ्याचा आणि प्रत्यक्ष उपस्थितीचा वापर करून, विमा उत्पादने ग्राहकांच्या अधिक जवळ नेण्याची आम्हाला आशा आहे. हे सर्व सर्वांसाठी सुलभ पद्धतीने केले जाईल शिवाय विश्वासार्हातही राखली जात आहे. एक कंपनी म्हणून, आम्ही याला आमच्या जबाबदारीचाच एक विस्तार मानतो; ती जबाबदारी म्हणजे आमच्या ग्राहकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि त्यांना केवळ आर्थिक प्रगती करण्यास मदत करणेच नव्हे, तर त्यांना सुरक्षितही ठेवणे. श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीचे कार्यकारी संचालक आणि CMO, श्री. आफताब अल्वी म्हणाले: “आमची वितरण क्षमता अधिक बळकट करण्यासाठी आणि व्यापक ग्राहक वर्गापर्यंत सर्वसमावेशक विमा उपाय पोहोचवण्यासाठी ‘पिरामल फायनान्स’सोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

या सहयोगामुळे आमच्या ग्राहक-केंद्रित सेवा आणि पिरामल फायनान्सचे विस्तृत ग्राहक-जाळे (ecosystem) एकत्र येत आहे.यामुळे विम्याची उपलब्धता वाढवणे आम्हाला शक्य होईल. विशेषतः अशा उपेक्षित आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये, जिथे विम्याचा प्रसार (penetration) अद्याप कमी आहे.आमचा विश्वास आहे की ही भागीदारी आर्थिक सुरक्षा अधिक दृढ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.तसेच, जनजागृती वाढवण्यात आणि ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करण्यातही ती उपयुक्त ठरेल. यातून शाश्वत विकास आणि विम्याचा व्यापक समावेश (insurance inclusion) यांना पूरक ठरणाऱ्या मजबूत धोरणात्मक आघाड्या उभारण्याप्रती असलेली आमची निरंतर कटिबद्धता अधोरेखित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande