
इस्लामाबाद , 25 मे (हिं.स.)।पाकिस्तानातील मरदान जिल्ह्यातून एक धक्कादायक दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. येथे स्वात एक्सप्रेसवेवर दोन बसांची भीषण धडक होऊन 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक बस बिघाडामुळे रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या बसने मागून जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील मरदान जिल्ह्यात हा रस्ता अपघात झाला. स्वात एक्सप्रेसवेवर वेगाने धावणाऱ्या एका बसने रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या मोटारबसला जोरदार धडक दिली. या अपघातात किमान 17 जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बसमध्ये जनरेटरचा बिघाड झाला होता. त्यामुळे ती बस थांबवण्यात आली होती. याचदरम्यान भरधाव बसने मागून धडक दिली. मृतांमध्ये अपर दीर आणि बाजौर जिल्ह्यातील रहिवाशांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक अहवालानुसार, उभी असलेल्या बसच्या जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली होती. त्याचवेळी मागून आलेल्या वेगवान बसने तिला धडक दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही आणि बचाव पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे. ही बस प्रवाशांना नयनरम्य स्वात खोऱ्याकडे घेऊन जात होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode