बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जमावबंदी आदेश लागू
पुणे, 25 मे (हिं.स.)। पुणे पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी 14 दिवसांचा जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश 26 मे ते 8 जून या कालावधीत लागू राहणार असून, या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, सभा आणि निदर्शने घेण्यास बंद
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जमावबंदी आदेश लागू


पुणे, 25 मे (हिं.स.)। पुणे पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी 14 दिवसांचा जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश 26 मे ते 8 जून या कालावधीत लागू राहणार असून, या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, सभा आणि निदर्शने घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, धरणे, बंद, उपोषण आणि निदर्शने आयोजित केली जातात. तसेच अतिक्रमण हटाव कारवाईमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.याशिवाय आगामी बकरी ईद तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.पुणे पोलिसा यांनी नागरिकांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande