यूरिया, डीएपीसाठी शेतकऱ्यांची कसरत; यंदा मागणीपेक्षा कमी साठा
अमरावती, 26 मे (हिं.स.) रासायनिक खतांच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात शासनाने रेशनिंग केले असल्याने शेतकऱ्यांना खतांसाठी कसरत करण्याची वेळ आली आहे. युरिया व डीएपीचा विशेषतः तुटवडा असल्याने या खतांचा काळाबाजार वाढण्याचीही शक्यता अस
यूरिया, डीएपीसाठी शेतकऱ्यांची कसरत, रेशनिंगमुळे रोष यंदा मागणीपेक्षा कमी साठा


अमरावती, 26 मे (हिं.स.) रासायनिक खतांच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात शासनाने रेशनिंग केले असल्याने शेतकऱ्यांना खतांसाठी कसरत करण्याची वेळ आली आहे. युरिया व डीएपीचा विशेषतः तुटवडा असल्याने या खतांचा काळाबाजार वाढण्याचीही शक्यता असून लिंकिंगचा सामना करावा लागणार आहे. पर्यायी खतांचे दर वाढल्याने उत्पादनखर्च वाढणार आहे.

पावसाचा अंदाज बघता खत व पर्जन्यमान, या दोन्हींचा परिणाम उत्पादन सरासरीवर पडणार असून घट येण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात ७१ हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा कमी झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात ६.७७लाख हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येणार असून त्यानुसार कृषी विभागाने बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. यंदा एल निनोचा प्रभाव राहणार असून ८६२ मि.मी. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत प्रत्यक्ष पर्जन्यमान ८८ टक्क्यांपर्यतच राहण्याचा अंदाज वर्तविष्यात आला आहे. कापूस व तुरीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित असून सायोबीनचे क्षेत्र गतवेळी इतकेच राहणार असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे.खरीप हंगामासाठी एक लाख ५४ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर असून त्यातुलनेत आतापर्यंत ८५ हजार २६९ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. यामध्ये विशेषतः युरिया व डीएपीचा साठा अतिशय कमी आहे. यूरियाचा ३८,४०० मेट्रिक टन साठा मंजूर असताना ११ हजार ४७९ व डीएपीचा २४,९०० पैकी 7610 मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे.आहे. शेतकऱ्यांची मागणी व उपलब्ध साठा बघता शासनाने टंचाईच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही खतांसाठी रेशनिंग केले आहे. युरिया व डीएपीची एकरी एक आणि अधिकतम पाच बॅग देण्याचे शासनाचे आदेश आहेत. या रेशनिंगमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पाच एकरांपेक्षा अधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांना या टंचाईची अधिक झळ पोहोचत आहे.

खतांची जिल्ह्यातील स्थिती (मे. टन)

खतांचा प्रकार

: मंजूर आवंटन

: उपलब्ध साठा

यूरिया

: ३८,४००

: ११,४७९

एसएसपी

: ३७,८००

: २३,३८१

डीएपी

: २४,९००

: ७६१०

एमओपी

: ४,०००

: १६६५

संयुक्त खते

: ४८,९००

: ३९,३३६

एकूण

: १,५४, ०००

: ८३,४७१

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande