अमरावती जिल्ह्यातही इंधन तुटवडा
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डिझेल मिळण्यासाठी अडचणी अमरावती, 26 मे (हिं.स.) | जिल्ह्यात सद्यःस्थितीत खरीप हंगामातील शेती मशागतीचे कामे सुरू आहे. यावेळी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर सह अन्य कामांसाठी डिसेलची आवश्यकता भासत आहे. शेतकरी पेट्रोल पंपावर सकाळ पा
अमरावती जिल्ह्यातही इंधन तुटवडा


ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डिझेल मिळण्यासाठी अडचणी

अमरावती, 26 मे (हिं.स.) | जिल्ह्यात सद्यःस्थितीत खरीप हंगामातील शेती मशागतीचे कामे सुरू आहे. यावेळी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर सह अन्य कामांसाठी डिसेलची आवश्यकता भासत आहे. शेतकरी पेट्रोल पंपावर सकाळ पासूनच जातात. मात्र, यावेळी पेट्रोल पंपावर गर्दी, पेट्रोल डिझेलसाठी रांगांच रांगा, डिझेलचा तुटवडा, वेळेवर डिझेल नसणे आदी कारणांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. ही समस्या ग्रामीण भागातील सर्वच पेट्रोल पंपावर दिसून येत आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे खोळंबलेली आहे.

विदर्भासह राज्यात अनेक भागांत डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. तसेच 'नो स्टॉक'चे फलक पाहून परतावे लागत आहे. बुलडाणा जिल्ह्यात डिझेल तुटवड्याचे चित्र नुकतेच समाजमाध्यमांवर झळकले. अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही परिसरात इंधन तुटवडा जाणवत असून, डिझेलसाठी शेतकऱ्यांना रात्रभर रांगांमध्ये थांबावे लागत आहे. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर इंधन नसल्याने ट्रॅक्टर व शेतीची इतर कामे ठप्प झाली आहेत. शेतकरी कॅन आणि ड्रम घेऊन पेट्रोल पंपांवर ठिय्या देऊन आहेत. मात्र, डिझेलचा तुटवडा तसेच वेळेवर स्टॉक नसल्याने शेतकऱ्यांना एका पंपवरून दुसऱ्या पंपवर जावे लागत आहे. मात्र तिथेही आधीच गर्दी असते. अथवा पंप बंद असते. अशा तक्रारी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande