श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरूजींना पद्मश्री प्रदान
अमरावती, 26 मे (हिं.स.)| राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेणारे अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दन बापुरावजी बोथे गुरूजी यांना सोमवारी नवी दिल्ली येथे पद्मश्री प्रदान करण्यात आला. राष्ट
श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरूजींना पद्मश्री प्रदान


अमरावती, 26 मे (हिं.स.)| राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेणारे अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दन बापुरावजी बोथे गुरूजी यांना सोमवारी नवी दिल्ली येथे पद्मश्री प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याप्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. वाशिम जिल्ह्यातील गोगरी गावचे रहिवासी असलेल्या बोथे गुरूजींनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षापासून राष्ट्रसंतांच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांनी आदिवासी व वंचित घटकांसाठी आश्रमशाळा व वसतिगृहे उभारून शैक्षणिक क्रांती घडवली, तसेच राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन केले. हा माझा वैयक्तिक सन्मान नसून, सेवा मंडळाच्या पवित्र कार्याचा आणि तुकडोजी महाराजांच्या विचारांचा गौरव आह, असे यावेळी पद्मश्री बोथे गुरूजी म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande