अमरावती - शहरात तोतया कामगार अधिकाऱ्यांचा धुमाकूळ सुरूच
अमरावती, 26 मे (हिं.स.) शहरामध्ये तोतया कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. वॉटरबॉटल प्लँटवरून एक लाख लुटण्यापूर्वी अशाच पद्धतीची घटना चार दिवसांपूर्वी २० मे रोजी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्याच कार्यालयाचा नामोल्
अमरावती - शहरात तोतया कामगार अधिकाऱ्यांचा धुमाकूळ सुरूच


अमरावती, 26 मे (हिं.स.)

शहरामध्ये तोतया कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. वॉटरबॉटल प्लँटवरून एक लाख लुटण्यापूर्वी अशाच पद्धतीची घटना चार दिवसांपूर्वी २० मे रोजी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्याच कार्यालयाचा नामोल्लेख करून एका वीटभट्टीच्या ठिकाणी एका तोतयांच्या पथकाने छायाचित्रेही काढली. राजापेठ पोलिसांनी रविवारी (ता. २४) राजेश दत्तूजी जाधव (वय ३१, रा. कोंडेश्वर मंदिराजवळ, माताखिडकी) यांच्या तक्रारीवरून संशयित संतोष भीमराव कोलटेके (वय ४९, रा. जसापूर, ता. भातकुली), भाऊराव ऊर्फ किशोर किशनराव वाहाने (वय ६५), अजय प्रल्हादराव जांगळे (वय ५५, दोघेही रा. प्रशांतनगर, अमरावती) यांच्यासह एक महिला, अशा चौघा तोतयेगिरी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (ता. २३) बडनेराहद्दीत खंडेलवालनगर परिसरात वॉटर बॉटलच्या प्लॅंटवर अभिजित राजाभाऊ आबदेव (वय ४५) यांनाही चौघांनी सील ठोकण्यापासून वाचायचे असल्याचे धमकावून एक लाख १५ हजार रुपये लुटून नेले होते. राजेश दत्तूजी जाधव (वय ३१) यांना, कामगार आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यांना घेऊन दारव्हा येथे जायचे असा निरोप दिला. जाधव यांनी संतोष कोलटेकेशी २० मे रोजी संपर्क साधला असता, साडेचार वाजता कल्याणनगर चौकात श्री. जाधव हे पांढऱ्या रंगाच्या एमएच २७ एच ६५५८ क्रमांकाच्या कारजवळ गेले. त्यांना कारचालक व छायाचित्रकार म्हणून तोतयांनी सोबत नेले. २१ फेब्रुवारी रोजी संतोष कोलटेके यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात दुपारी १२ पर्यंत उपचार घेऊन ते नबाबपुरा येथे गेले. गावातील वीटभट्टीची तपासणी करून राजेश जाधव यांनी फोटो व व्हिडिओ काढायला लावले. कोलटेके यास खोलापुरात सोडल्यावर राजेश जाधव यांनी मजुरीचे दोन हजार, तसेच फोटो व व्हिडिओचे, असे वेगळे पाच हजार मागितले. मात्र त्यांना कोलटेके याने फक्त एक हजार रुपये दिले. पैसे मागितले असता धमकीही दिली, असा आरोप जाधव यांनी राजापेठ ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande