पुणे - वारीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो’; लवांडे यांच्या जामीन अर्जावर पोलिसांचा आक्षेप
पुणे, 26 मे (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वारकरी संप्रदायातील संत-महंत, महाराज आणि कीर्तनकारांविषयी समाज माध्यमावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. विकास सदाशिव
पुणे - वारीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो’; लवांडे यांच्या जामीन अर्जावर पोलिसांचा आक्षेप


पुणे, 26 मे (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वारकरी संप्रदायातील संत-महंत, महाराज आणि कीर्तनकारांविषयी समाज माध्यमावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. विकास सदाशिव लवांडे (वय ५१, रा. शिंदेवाडी, हवेली) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६ (१)(ए), २९९ आणि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नलिनी आशिष वायाळ (रा. येरवडा) यांनी तक्रार दाखल केली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर लवांडे यांनी ॲड. मिलिंद पवार यांच्या माध्यमातून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. मात्र, वाघोली पोलिसांनी या अर्जास तीव्र विरोध दर्शविला.

तपास अद्याप सुरू असून साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत. या टप्प्यावर जामीन मंजूर झाल्यास आरोपी तक्रारदार व साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, अशी शक्यता पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केली. तसेच, आषाढी एकादशी आणि आगामी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही पोलिसांनी नमूद केले. त्यामुळे आरोपीवर कठोर कायदेशीर बंधने घालण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande