काँग्रेस संघटन मजबूत करण्याचे दिलीपराव देशमुखांचे आवाहन
लातूर, 27 मे (हिं.स.)। काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झालेले प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी पदाधिकाऱ्यांसह आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेत आभार व्यक्त क
दिलीपराव देशमुख


लातूर, 27 मे (हिं.स.)। काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झालेले प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी पदाधिकाऱ्यांसह आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेत आभार व्यक्त केले.

यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी नूतन अध्यक्ष प्रा. शिवाजी जवळगेकर यांचे अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून पक्ष विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध समाजघटकांना सोबत घेऊन संघटन वाढवण्यावर भर द्यावा, असे सांगितले.

या भेटीप्रसंगी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक अँड. बाबासाहेब गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज सिरसाठ, जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष जगन्नाथ पाटील, माजी उपमहापौर कांबळे, काँग्रेस समन्वयक सचिन दाताळ, अँड. अंग गायकवाड यांच्यासह लातूर शहर व जिल्ह्यातील विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande