
नाशिक, 27 मे (हिं.स.)। नाशिक जवळ असलेल्या कश्यपी धरणाच्या पर्यटनासाठी गेलेल्या पती-पत्नी व शेजारी राहणाऱ्या दोन मुलांचा पाण्यामध्ये बुडून अंत झाल्याची घटना घडली आहे. पती-पत्नी हे शहरातील मखमलबद परिसरात राहण्यासाठी आलेले होते ते मूळचे संगमनेर तालुक्यातील आहे. या सर्वांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की नाशिक शहराजवळ असलेल्या कश्यपी धरण परिसरामध्ये पर्यटनासाठी सचिन कैलास ठोंबरे वय वर्ष 30 सध्या राहणार मखमलाबाद मूळचे राहणार संगमनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील आहे. त्यांची पत्नी रोहिणी सचिन ठोंबरे वय वर्ष 25 , तसेच त्यांच्या घराशेजारी म्हणजेच मखमलाबाद परिसरामध्ये राहणारे सोळा वर्षीय केतन अनिल पवार व 14 वर्षाचा कौशल्य अनिल पवार हे सर्वजण या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले होते. सर्वजण सोमवारी पाण्यामध्ये उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी तातडीने रेसक्यु टीम दाखल झाली त्यानंतर या सर्वांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यातील रोहिणी ठोंबरे ही सर्वसाधारण सात महिन्याची गरोदर असल्याचे देखील समोर आले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV