लातूरमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर 30 मे रोजी शिवसेना-उबाठा गटाचामोर्चा
लातूर, 27 मे (हिं.स.)। उदगीर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी आणि जनतेच्या विविध प्रश्नासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्य
मोर्चा


लातूर, 27 मे (हिं.स.)। उदगीर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी आणि जनतेच्या विविध प्रश्नासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये प्राधान्याने, रखडलेला पिक विमा व अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलजीवन योजनेत अनेक ठिकाणी पूर्ण कामे न करताच कामे पूर्ण झाल्याचे सांगून पैसे उचलले गेले आहेत परंतु कामे अर्धवट राहिलेले आहेत त्या दोषीवर योग्य ती कारवाई करून कामे पूर्ण करावीत व तीव्र पाणीटंचाईचे संकट दूर करावे. ग्रामीण भागामध्ये विजेची समस्या फार मोठी आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा अखंडित वीज व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते मात्र अजूनही वीज कमी अधिक दाबाने मिळत असल्याने शेतकऱ्याच्या विद्युत मोटारी जळून जात आहे. त्यासाठी वीज पुरवठा सुरळीत करावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली होती मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी आश्वासनाकडे पाठ फिरवली आहे. सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वप्निल अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढल्या जाणाऱ्या या मोर्चामध्ये प्राधान्याने युवा सेना जिल्हाप्रमुख लक्ष्मण पेठकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील उदगीर तालुकाप्रमुख प्रशांत मोरे संयोजक वेंकट साबणे यांच्यासह प्रकाश हैबतपुर शिवकांत चढणारे गोविंद बेंबडे नितीन धूळ शेटे सारंग अगलावे महेश फुले संजय मठपती बालाजी मुरारीकर दत्ता पलंगे यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपलब्ध राहणार आहे सदरील मोर्चा 30 मे रोजी सकाळी दहा वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकापासून निघून उपजिल्हाधिकार्यालय येथे विसर्जन होईल असेही संयोजकाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

हा मोर्चा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्यामुळे जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन स्वप्निल अण्णा जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande