बीड - श्री क्षेत्र कपिलधार येथे एक जून रोजी एकदिवसीय सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन
बीड, 28 मे (हिं.स.)। संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांनी लिहिलेल्या परम रहस्य ग्रंथाला ४२६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने श्री क्षेत्र कपिलधार येथे एक जून रोजी एकदिवसीय सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने
बीड - श्री क्षेत्र कपिलधार येथे एक जून रोजी एकदिवसीय सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन


बीड, 28 मे (हिं.स.)। संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांनी लिहिलेल्या परम रहस्य ग्रंथाला ४२६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने श्री क्षेत्र कपिलधार येथे एक जून रोजी एकदिवसीय सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या सोहळ्यात राज्यभरातून दीड हजार भाविक सहभागी होतात. वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांनी लिहिलेल्या परम रहस्य ग्रंथ हा आध्यात्मिक साधना, आत्मज्ञान आणि भक्तिमार्गाचा सखोल उलगडा करणारा ग्रंथ आहे. संत मन्मथ स्वामी यांच्या विचारधारेचा सार या ग्रंथातून

व्यक्त होत असल्याने भाविकांमध्ये त्याला विशेष महत्त्व आहे.

सोहळ्याची सुरवात सकाळी इष्ट लिंग पूजेने होणार आहे. त्यानंतर संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीस महाअभिषेक व आरती होईल. यानंतर मंदिरासमोर सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी बारा ते तीन अशा दोन सत्रांत परम रहस्य ग्रंथाचे सामूहिक पारायण होणार आहे. दुपारी तीनला शिवाचार्यांचे आशीर्वचन होणार असून त्यानंतर महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होईल. या पारायण सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande