हदगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्र्यांना निवेदन
नांदेड, 28 मे (हिं.स.) : हदगाव तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासात्मक मागण्यांसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी मुंबई येथे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शासकीय स्तरावर भेट घेतली. या भेट
हदगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्र्यांना निवेदन


नांदेड, 28 मे (हिं.स.) : हदगाव तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासात्मक मागण्यांसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी मुंबई येथे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शासकीय स्तरावर भेट घेतली.

या भेटीदरम्यान त्यांनी हदगाव तालुक्यातील जनतेच्या पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न, महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे तसेच स्थानिक विकासाला गती देणाऱ्या विविध मुद्द्यांवर सविस्तर निवेदन सादर केले. तालुक्यातील जनहिताचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावरही सविस्तर चर्चा झाली. संबंधित विभागांनी प्रलंबित कामांवर लवकर कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी देवसरकर यांनी केली.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदन स्वीकारून सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, तसेच संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देऊन तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

या भेटीमुळे हदगाव तालुक्यातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande