

भगुर / देवळाली कॅम्प, 28 मे (हिं.स.)। स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती त्यांचे जन्मगाव असलेल्या भगूर सह नाशिक जिल्ह्यात मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
भगूर शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वि जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौका.सह सावरकर जन्म स्थान स्मारकासह भगूरच्या गायकवाड गल्ली पासून सुरुवात होऊन मेन रोड सह प्रमुख मार्गावरुन मोठी भव्यदिव्य शोभायात्रा,अभिनेते भेटी अभिवादन देशभक्ती गितासह, मानवंदना, मान्यवराचे नतमस्तक विनम्र अभिवादन करून अशा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी झाली.
गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी. सकाळी ७ वाजता पुरातन विभागाचे सहाय्यक संचालक अनिल गोटे, अधिकारी शरद श्रीरामे,शरद चौधरी, किशोर बच्छाव यांच्या हस्ते स्मारकातील जन्म खोलीत विधीवत शासकीय पुजा झाली, त्यानंतर भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणा विशाल बलकवडे यांनी भगूर नगर परिषदेच्या वतीने स्मारक आणि शिवाजी महाराज चौकातील स्वातंत्रवीर सावरकर पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी भगूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ .सचिनकुमार पटेल,उपाध्यक्ष प्रसाद आडके ,नगरसेवक विशाल बलकवडे,दिपक बलकवडे, मृत्युंजय कापसे नगरसेविका सौ. विद्या दीपक बलकवडे, सौ.जयश्री काकासाहेब देशमुख,सौ.सुजाता विशाल शिरसाट ,सौ. मनीषा अंबादास कस्तुरे,सौ.लता थापेकर यांच्यासह नगरपरिषद कामगार उपस्थित होते. त्यानंतर सावरकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक रमेश पवार व आधारस्तंभ ठाणे गुन्हे शाखा उपायुक्त शेखर बागडे ,नवी मुंबई पोलीस उपायुक्त शामराव शिंदे, समितीचे सचिव प्रशांत कापसे,अनिल पवार, मुंबई मंत्रालयात सहाय्यक सचिव मंगेश बागडे, गजानन कातकडे,माजी खासदार हेमंत गोडसे,देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड नामनिर्देशन सदस्य सचिन ठाकरे यांच्या उपस्थितीत गायकवाड गल्लीतुन स्वातंत्रवीर सावरकरांच्या वेशभूषा साकारलेले परीक्षित जोशी यांच्यासह ग्रंथ दिंडी आकर्षण शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी अभिनेते विजय पाटकर,अभिनेते श्रीनिवास मोरे, इंडियन आयडॉल हर्षद गोळेसर, दुही गोळेसर हे मोटार रथावर
विराजमान झाले होते. ढोल ताशा, संबळाच्या तालावर
गुलालवाडी ढोल पथक, मारुती मंदिर भजनी मंडळ, गजानन महाराज भजनी मंडळ, प्रविण पाळदेचे पहिलवानी मल्लखांब प्रात्यक्षिके,भक्तांची गिते गाऊन आणि भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर, राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर असा जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली. तसेच शोभायात्रा मार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भगूर शहराध्यक्ष सुमित चव्हाण, उपशहराध्यक्ष श्याम देशमुख यांनी मांगिरबाबा चौक याठिकाणी थंडगार सरबतच वाटप केले . याप्रसंगी सावरकर जयंती उत्सव समितीचे जयंती अध्यक्ष चेतन बागडे, उपाध्यक्ष शाम भागवत, कार्याध्यक्ष शैलेश उदावंत , संदीप शेटे, प्रताप गायकवाड,संभाजी देशमुख,वसंत पाटील,अविनाश कातकडे, राजाभाऊ सोनवणे, सुभाष जाधव,पंकज शेलार,मनोज कुंवर,भुषण कापसे, मंगेश मरकड, तानाजी करंजकर सांस्कृतिक मंडळे, सावरकर भक्त मोठ्या प्रमाणात समाविष्ट झाले होते.त्यानंतर नगराध्यक्षा सौ.प्रेरणा बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोभायात्रा समारोप संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर सावरकर जिवनावर अभिनेते मान्यवर यांनी मार्गदर्शन केले, त्यानंतर विश्व हिंदू परिषद केंद्रीय समिती सदस्य एकनाथराव शेटे, नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांनी स्मारकात भेट देऊन सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक मिताली कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव कोटमे, तलाठी दिपाली धनगर, लक्ष्मण सावजी,अशोक मोजाड, ,प्रमोद जाधव, किशोर गायकवाड,अजय पाटील,अरुण गडकर,रवि येरम,निलेश हासे, रवींद्र मालुंजकर,प्रमोद घुमरे,शेखरजाधव,नारायणआडके,योगेश भुरके, सुनील जोरे, निलेश हासे, अंबादास आडके उपस्थित होते. दरम्यान नाशिक येथील चारुदत्त दीक्षित प्रस्तुत बागेश्री यांनी देशभक्ति गितांचा कार्यक्रम सादर केला.तसेच भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. तर सायकल रॅली, विविध संघटनेच्या वतीने दिवसभर सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याचे भगूर नगराध्यक्षा सौ.प्रेरणा विशाल बलकवडे हस्ते सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV